न्याय मिळायलाच पाहिजे : विराट कोहली   

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यानेही यावर प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक स्टोरी शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने निष्पाप लोकांवरील या ’घृणास्पद’ हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली. या हल्ल्यावर त्यांची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मानेही प्रतिक्रिया दिली.
 
विराट कोहलीने पहलगाम हल्ल्याबाबत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये लिहिले की, पहलगाममधील निष्पाप लोकांवर झालेल्या या भयानक हल्ल्यामुळे मला दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. या हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना शांती आणि शक्ती मिळो आणि या क्रूर हल्ल्यासाठी न्याय मिळाला पाहिजे, असंही त्याने लिहिले आहे. दरम्यान, विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या हल्ल्याबाबत एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली.
 
अनुष्का शर्मा हिने लिहिले की, काश्मीरमधील पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे माझे मन दुःखी आहे. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. हा एक भयानक हल्ला आहे जो कधीही विसरता येणार नाही. हा हल्ला मंगळवारी पहलगामच्या प्रसिद्ध बैसरन व्हॅलीमध्ये झाला, यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 

Related Articles